मुंबई- 🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार –
आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विरोधक राज्यातील विविध विषयांवरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत, तर दुसरीकडे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाचा धडाका लावला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पुण्याच्या-वानवडी-भागा/
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी (दि.४) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ४१ विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत मच्छिमार कल्याणकारी महामंडळाची घोषणा करण्यात आली असून या महामंडळासाठी ५० कोटी मंजूर करण्यात आले आहे. तसेच, गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्ज सेवन केल्यास कारवाई होणार असून यासाठी २ वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने ३८ निर्णय घेतले होते. यामध्ये सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरांच्या योजनेस सरकारने मंजुरी दिली होती.
राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय :
- – मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची घोषणा
- – मच्छीमार कल्याणकारी महामंडळासाठी ५० कोटी मंजूर
- – गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्ज सेवन केल्यास कारवाई होणार
- – मेलनोर इन्फो टेक्नॉलॉजी ही कंपनी गुंतवणूक करणार
- – डिफेन्स क्लस्टरसाठी १० हजार कोटींची गुंतवणूक करणार
- – रत्नागिरीत १९ हजार ५०० कोटींची गुंतवणूक करणार .