योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी; निरोगी जीवनासाठी योगाचा स्वीकार करा – सीताराम गावडे

0
52
योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी; निरोगी जीवनासाठी योगाचा स्वीकार करा – सीताराम गावडे
योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी; निरोगी जीवनासाठी योगाचा स्वीकार करा – सीताराम गावडे

योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी; निरोगी जीवनासाठी योगाचा स्वीकार करा – सीताराम गावडे

ऑर्बिट योगा स्टुडिओच्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात मान्यवरांचे प्रतिपादन; योग प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने

सावंतवाडी, दि. २१ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑर्बिट योगा स्टुडिओ, सावंतवाडी यांच्या वतीने धनश्री मंगल कार्यालय येथे आयोजित विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करताना योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असल्याचे सांगितले.
गावडे म्हणाले, “योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारे प्रभावी विज्ञान आहे. योग्य मार्गदर्शनाखाली नियमित योगाभ्यास केल्यास निरोगी आणि आनंदी जीवन जगणे शक्य होते.” त्यांनी ऑर्बिट योगा स्टुडिओचे प्रशिक्षक अमोल सोनावणे यांच्या कार्याचे कौतुक करत सर्वांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले होत्या. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. चौगुले, संदीप कुडतरकर तसेच युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते.
मान्यवरांनी योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनशैली विकसित होत असल्याचे सांगितले. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, चिंता आणि विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संगीताच्या तालावर आकर्षक योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सहभागींच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव करण्यात आला. परीक्षक म्हणून निवृत्त शिक्षक भरत गावडे, सहायक पोलिस निरीक्षक जयेश खंदरकर, बाळू कशाळीकर, तहसीलदार श्रीधर पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी काम पाहिले.
योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली. योगाचा दैनंदिन जीवनात समावेश करून निरोगी, आनंदी आणि सुदृढ जीवन जगण्याचा संकल्प यावेळी अनेकांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here