ताथवडे येथे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी २० हेक्टर जमीन मंजूर

0
24

मुंबई
 पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड तसेच इतर अनुषंगिक कार्यालयांच्या उभारणीसाठी पुणे जिल्ह्यातील ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री यांच्या अंतिम मान्यतेनंतर येत्या दोन ते तीन दिवसांत यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली.
गृह विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ताथवडे येथील वळूभाता प्रक्षेत्रातील एकूण ६७ हेक्टर ९४ आर क्षेत्रापैकी २० हेक्टर जमीन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड व इतर संबंधित कार्यालयांसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला स्वतंत्र आणि सुसज्ज प्रशासकीय संकुल उपलब्ध होणार असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधा उभारण्यासाठीही या जागेचा उपयोग होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here