३६ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत भद्रकाली प्रॉडक्शन्स ‘करुणाष्टके’ नाटकाने पटकाविले प्रथम पारितोषिक
३६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन्स, मुंबई या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला रु. ७,५०,०००/- चे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत.
जिगिषा अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या भूमिका या नाटकास रु. ४,५०,०००/- चे द्वितीय पारितोषिक आणि जिगिषा क्रिएशन्स या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकास रु. ३,००,०००/- चे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
दिग्दर्शन :
प्रथम पारितोषिक (रु.१,५०,०००/-) प्राजक्त देशमुख (नाटक- करुणाष्टके)
द्वितीय पारितोषिक (रु.१,००,०००/-) चंद्रकांत कुलकर्णी (नाटक- भूमिका)
तृतीय पारितोषिक (रु.५०,०००/-) विनोद रत्ना (नाटक- चिरंजीव परफेक्ट बिघडलाय)
नाट्यलेखन :
प्रथम पारितोषिक (रु.१,००,०००/-) क्षितीज पटवर्धन (नाटक- भूमिका )
द्वितीय पारितोषिक (रु.६०,०००/-) प्राजक्त देशमुख (नाटक- करुणाष्टके)
तृतीय पारितोषिक (रु.४०,०००/-) ऋषिकेश जोशी (नाटक- सं.बोलविता धनी)
प्रकाश योजना :
प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) तेजस देवधर (नाटक- ठरलय फॉरेव्हर)
द्वितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) शितल तळपदे (नाटक- सविता दामोदर परांजपे)
तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) अमोघ फडके (नाटक- मी vs मी)
नेपथ्य :
प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) सचिन गावकर (नाटक- करुणाष्टके)
द्वितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) संदेश बेंद्रे (नाटक- सविता दामोदर परांजपे)
तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) सुमीत पाटील (नाटक- ठरलय फॉरेव्हर)
संगीत दिग्दर्शन :
प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) अजित परब (नाटक-संगीत बोलविता धनी)
द्वितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) निनाद म्हैसाळकर (नाटक- सविता दामोदर परांजपे)
तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) अशोक पत्की (नाटक- कुटुंब किर्रतन )
वेशभूषा :
प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) मयुरा रानडे (नाटक-सं.बोलविता धनी)
द्वितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) चैत्राली डोंगरे (नाटक- सविता दामोदर परांजपे)


