MAHA-TET परीक्षा २८ जून २०२६ रोजी; रायगडमध्ये १०,२०३ उमेदवार परीक्षेला बसणार
MAHA-TET परीक्षा २८ जून २०२६ रोजी; रायगडमध्ये १०,२०३ उमेदवार परीक्षेला बसणार
अलिबाग/रायगड
शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) ही २८ जून २०२६ रोजी राज्यभरात आयोजित करण्यात येणार असून रायगड जिल्ह्यात ९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. जिल्ह्यातून एकूण १०,२०३ उमेदवार परीक्षेला बसणार आहेत.
परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सर्व केंद्रांवर CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक पडताळणी, फेस रेकग्निशन तसेच AI-आधारित देखरेख प्रणाली लागू करण्यात आली आहे. उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी मूळ फोटो ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
परीक्षा दरम्यान मोबाईल फोन, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर तसेच इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
वेळापत्रक :
🔹 पेपर-1 : सकाळी ०८.३० पूर्वी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक
🔹 पेपर-2 : दुपारी १२.३० पूर्वी उपस्थित राहणे आवश्यक
उमेदवारांनी केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवरच विश्वास ठेवावा, अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व केंद्रांवर आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.