रत्नागिरी- रत्नागिरी विधानसभेसाठी भाजपा बंडाच्या तयारीत आहे. भाजपाने रत्नागिरी जिल्ह्यात फक्त एकच जागा लढविणार असल्याचे संकेत दिले असताना या निर्णया विरोधात जिल्ह्यात भाजपा कार्यकर्ते बंड करण्याच्या तयारीत आहे. https://sindhudurgsamachar.in/अमेरिकेत-धडकले-आतापर्यंत/
याबाबत बोलताना भाजपाचे माजी आमदार बाळ माने म्हणाले की, शोले सिनेमात फ्लॅशबॅक दाखवला आहे. गब्बरला गावातली लोक घाबरतात, तशीच स्थिती रत्नागिरीत आहे. जय व वीरू हे दोघे गावाला गब्बरपासून वाचवतात, आता एकट्यालाच काम करायचे आहे, असे सांगत भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. भाजपा बूथप्रमुखांनी पुढील तीन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवा, या विधानसभा निवडणुकीत काय करायचे आहे. तीन निवडणुकांत झालेला पराभव आणि २०१९ मध्ये घडलेल्या घटना आपण विसरलो नाहीये, ही सत्वपरीक्षा आहे, असे प्रतिपादन भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख, माजी आमदार बाळ माने यांनी केले. स्वयंवर मंगल कार्यालयात रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभेतील भाजपच्या ३५० बूथप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.