वैभववाडी–कोल्हापूर नवीन रेल्वे मार्गाच्या प्रस्तावाचा मंत्रालयात आढावा
वैभववाडी–कोल्हापूर नवीन रेल्वे मार्गाच्या प्रस्तावाचा मंत्रालयात आढावा
मुंबई
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना रेल्वेमार्गाने जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी वैभववाडी–कोल्हापूर नवीन रेल्वे मार्गाच्या प्रस्तावाबाबत मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली.
बंदर विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ११ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या उभारणीसंदर्भातील विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि विकासात्मक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभाग आणि यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
हा रेल्वे मार्ग साकार झाल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण अधिक गतिमान होण्यास मदत होणार असून, पर्यटन, व्यापार, उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या बैठकीस बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, कोकण रेल्वेचे महाव्यवस्थापक, महारेल मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक, मध्य रेल्वे मुंबईचे महाव्यवस्थापक तसेच संबंधित विभागांचे व