Maharashtra: महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादितच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न

0
21
मुख्यमंत्री शिंदे,भंडारी समाज भवन,
भंडारी समाज भवनासाठी उपलब्ध केली जागा

⭐महाप्रितने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. १२ :- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित (महाप्रित) ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. महाप्रितच्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची कामे जलद आणि दर्जेदार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित- महाप्रीत संचालक मंडळाची २५ वी बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि. 11 ऑक्टोबर) संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला व्यवस्थापकीय संचालक तथा सामाजिक न्याय विभागाचे सचिव बिपीन श्रीमाळी यांच्यासह संचालक मंडळाचे इतर विभागीय प्रतिनिधी आणि महाप्रीतचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की महाप्रितच्या माध्यमातून ठाणे शहरात क्लस्टर प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. यामुळे पुनर्वसनासाठी हजारो परवडणारी घरं उपलब्ध होणार आहेत. यातून अनेकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात महाप्रित राज्यात आणि परराज्यात चांगले काम करत आहे. मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना अंतर्गत साकारणाऱ्या प्रकल्पामुळे राज्यातील १० हजार लघु आणि मध्यम औ‌द्योगिक घटकांना अक्षय ऊर्जा उपलब्ध होणार आहे. सोबतच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगतच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मिती करून या महामार्गाच्या वैशिष्टयात भर पडणार आहे. गोवा ऊर्जा विकास अभिसरणासाठी सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीची संधी महाप्रितला मिळाली आहे. ही संधी म्हणजे महाप्रितच्या जागतिक दर्जाच्या कामाची पावती आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

या बैठकीत महाप्रित संचालक मंडळाने विविध प्रस्तावांवर मंजूर केला त्यात प्रामुख्याने १) ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रमातील घटक ज्यात किसन नगर ठाणे येथील दोन मोकळ्या जमिनींवर सुमारे १ हजार ६५० कोटींच्या ५ हजार २१३ पुनर्वसन निवासी युनिट्सचे बांधकाम, २) ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट अँड एरिया इम्प्रूव्हमेंट कंपनी लिमिटेड या एसपीव्हीची ठाणे येथील क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निर्मिती, ३) पीपीपी मॉडेल अंतर्गत ठाण्यातील किसान नगर, कोपरी आणि लोकमान्य नगर येथील क्लस्टर्सच्या विकासास मान्यता, ४) महाराष्ट्र केमिकल लॉजिस्टिक पार्क (MCLP) साठी पीडीएमसीच्या नियुक्तीला मंजुरी १ हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन अंदाजे १ हजार ३७२ कोटी, ५) महाप्रित द्वारे AIF ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी १० हजार कोटींच्या निधी उभारणीसाठी मान्यता, ६) “मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना (एम.एल.एस. वाय.) अंतर्गत राज्यातील १० हजार लघु आणि मध्यम औ‌द्योगिक घटकांसाठी एमएसएमई क्षेत्रासाठी ४०० मेगावॅट क्षमतेच्या भारतातील सर्वात मोठ्या रूफ टॉप सोलार योजनेपैकी एक अस्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. सोबतच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी सौर प्रकल्पांसाठी MSRDC सोबत JVA करण्याचे निर्देश तसेच NTPC ग्रीन सोबत JVA ला 10GW च्या अक्षयऊर्जा प्रकल्पांसाठी पुढील कार्यवाहीसाठी आणि गोवा शासनाचे गोवा ऊर्जा विकास अभिसरण साठी ३० MW सौर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत डिसेंबर २०२३ मध्ये दावोस येथे करण्यात आलेल्या सौर, पवन-सौर संकरित प्रकल्प, AI प्रकल्पाच्या विविध प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. महाराष्ट्र शासनाद्वारे महाप्रितला देण्यात आलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व भिवंडी आणि चंद्रपूर, यवतमाळ येथे प्रधानमंत्री आवास योजना या प्रकल्पांची माहिती मंडळाला देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here