राजापूर: कोकणात राजापूर तालुक्यात पाचल येथे दांडिया खेळता खेळता एका विद्यार्थिनीला खेळताना चक्कर आली. शिक्षकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र दुर्दैवाने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महात्मा-फुले-नविनीकरणी/
ऐन नवरात्रोत्सवात राजापूर पाचल परिसरावर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात हा दुर्दैवी सगळ्यांनाच मनाला चटका लावून जाणारा प्रसंग घडला आहे. ऐन नवरात्रोत्सवात घडलेल्या या घटनेने पाचल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजापूर तालुक्यातील आजीवली मानेवाडी येथील वैष्णवी प्रकाश माने वय १६ या विद्यार्थिनीचा नवरात्रोत्सवातच दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. सरस्वती पूजनावेळी सुरू असलेल्या दांडिया कार्यक्रमात हा दुर्दैवी प्रसंग घडला.