‘सारथी’च्या मुख्यालयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

0
20
'सारथी'च्या मुख्यालयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
'सारथी'च्या मुख्यालयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

‘सारथी’च्या मुख्यालयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

प्रलंबित प्रस्तावांना मंजुरीचे आश्वासन

पुणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)च्या मुख्यालयाला भेट देऊन संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना आवश्यक ती मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी संस्थेच्या परिसरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांनी संस्थेच्या शैक्षणिक, संशोधन, प्रशिक्षण तसेच मानव विकासाशी संबंधित विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. विद्यार्थी, संशोधक आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली.
या भेटीप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सचिव शैला ए., विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच ‘सारथी’चे अध्यक्ष अजित निंबाळकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here