Maharashtra: सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ चे लोकार्पण

0
11
ठाणे खाडी पूल क्र. ३ चे लोकार्पण ,
सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ चे लोकार्पण

⭐रेवस-रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गावरील ७ खाडी पुलांच्या कामांचे भुमिपूजन
वाशी/वृत्तसेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सायन- पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ च्या मुंबई-पुणे उत्तरवाहिनी मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. रेवस-रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गावरील ७ खाडी पुलांच्या कामांचे भुमिपूजन देखील यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ चे लोकार्पण https://sindhudurgsamachar.in/kokan-पावशी-सर्व्हिस-रस्त्याच/

● प्रत्येकी ३ मार्गिकेचे २ पूल बांधण्यात येणार.
(मुंबईहून पुण्याकडे जाणारी उत्तर वाहिनी काम पूर्ण व पुण्याहून मुंबईकडे जाणारी दक्षिण वाहिनी काम प्रगतीपथावर)
● प्रकल्पाची एकूण किंमत : रु. ५५९ कोटी.

● पुलाची लांबी : ३१८० मी.

सद्यस्थितीत उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण करुन ती वाहतुकीस खुली करण्यात येत आहे.

■ रेवस ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील ७ पुलांच्या कामाचे भूमिपूजन

● रेवस ते रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाची एकूण लांबी : ४९८ किमी.

● पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्ग, कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनारे यांना गतिमान महामार्गाने जोडणारा प्रकल्प.

● सर्व ७ पुलांची एकूण लांबी २६.७० कि.मी. आणि एकूण प्रशासकीय मान्यता रु. ७८५१ कोटी इतकी आहे.

✅ रेवस- कांरजा भागातील धरमतर खाडीवरील पूल :

● एकूण लांबी : १०.२० किमी.
● प्रशासकीय मान्यता : रु. ३०५७ कोटी
● पुलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पुल)

● कामाची मुदत : ३ वर्ष – २०२७ मध्ये पूर्ण होईल.

✅ दिघी आगरदांडा भागातील आगरदांडा खाडीवरील पूल:

● एकूण लांबी : ४.३१ किमी.
● प्रशासकीय मान्यता रक्कम : १३१५ कोटी.
● पुलाचा प्रकार: केबल स्टे

● कामाची मुदत : ३ वर्ष

✅ केळशी भागातील केळशी खाडीवरील पूल :
● एकूण लांबी : ६७० मी.
● प्रशासकीय मान्यता रक्कम रु. १४८ कोटी
● पुलाचा प्रकार: बॉक्स गर्डर

● कामाची मुदत : ३ वर्ष

✅ कुणकेश्वर येथील पुलाचे बांधकाम

● एकूण लांबी : १५८० मी.
● प्रशासकीय मान्यता रक्कम रु. २५७ कोटी

● पुलाचा प्रकार: केबल स्टे

✅ रेवदांडा- साळाव भागातील कुंडलिका खाडीवरील पूल :

● एकूण लांबी : ३.८२ किमी.
● प्रशासकीय मान्यता रक्कम : १७३६ कोटी
● पुलाचा प्रकार : केबल स्टे

● कामाची मुदत : ३ वर्ष

✅ बागमांडला वेश्वी भागातील बाणकोट खाडीवरील पूल:

● एकूण लांबी : १.७११ किमी.
● प्रशासकीय मान्यता : रक्कम रु. ४०८ कोटी
● पुलाचा प्रकार : केबल स्टे

● कामाची मुदत : ३ वर्ष

✅ जयगड खाडीवरील पूल
● एकूण लांबी : ४.४० कि.मी.
● प्रशासकीय मान्यता- रक्कम रु. ९३० कोटी
● पुलाचा प्रकार: केबल स्टे
● कामाची मुदत : ३वर्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here