मुंबई/🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी आचारसंहिता लागेल, अशी चर्चा असतानाच हा मुहूर्तही हुकला आहे. आता मंगळवारी किंवा बुधवारी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) सकाळी साडेनऊ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. आचारसंहिता अद्याप लागली नसल्याने आता अवधी मिळाल्याच्या संधीचा फायदा घेत राज्य सरकार आणखी काही लोकप्रिय निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. https://sindhudurgsamachar.in/कोलकाता-डॉक्टर-बलात्कार/
या पार्श्वभूमीवर आज सकाळी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. विधान परिषदेच्या राज्यपाल नामनियुक्त बारा रिक्त जागा भरण्याच्याही हालचाली सुरू आहेत. राज्यपालांची मान्यता घेऊन या जागा भरण्याची खेळी महायुतीकडून आता खेळली जाऊ शकते.