सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीचा एल्गार

0
21
सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीचा एल्गार
सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीचा एल्गार

सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीचा एल्गार

बैठकीच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

छत्रपती संभाजीनगर
 राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट, सरसकट कर्जमाफी जाहीर करावी आणि कर्जमाफीतील जाचक अटी तातडीने रद्द कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य आंदोलन करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो शेतकरी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात सहभाग घेत सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला की, राज्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एका बाजूला पावसाने ओढ दिल्याने पेरण्या रखडल्या असून उभी पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत, तर दुसऱ्या बाजूला कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या जाचक अटींमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. या अस्मानी आणि सुलतानी संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विनाअट, सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे तीन दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारकडून चर्चेचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने सरकारने वेळकाढूपणा आणि दिशाभूल केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला.
आंदोलनादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून मंगळवारी मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्जमाफीतील जाचक अटी हटविण्यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाचा मान राखत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
तथापि, बैठकीत ठोस निर्णय झाला नाही, विनाअट सरसकट कर्जमाफी जाहीर झाली नाही किंवा जाचक अटी रद्द करण्यात आल्या नाहीत, तर राज्यभर अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा लढा शेवटपर्यंत सुरू राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार, आमदार अनिल देशमुख, खासदार निलेश लंके, खासदार बजरंग सोनवणे, खासदार कल्याण काळे, खासदार अमर काळे, माजी आमदार राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर, सलील देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here