🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/ परळी/ 22 ऑक्टोबर
काकीनाडा पोर्ट येथून शिर्डीकडे जात असलेल्या एक्सप्रेस रेल्वेला परळी – गंगाखेड दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड करुन थांबवत चोरांनी लूट केली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
परळी हे नांदेड व सिकंदराबाद विभागांना जोडणारे रेल्वे स्टेशन आहे. परळीमार्गे दररोज किमान 25 रेल्वेगाड्या धावत असतात. काकीनाडा पोर्ट ते साईनगर शिर्डी ही एक्सप्रेस नेहमीप्रमाणे शनिवार रोजी रात्री 11.45 वाजता परळी रेल्वे स्थानकातून सुटली. त्यानंतर उखळी ते वडगाव निळा दरम्यान असलेल्या आऊटर सिग्नलला बिघाड करत ही रेल्वे थांबवण्यात थांबवण्यात आली. यावेळी काही जणांनी रेल्वेत शिरुन आतील प्रवाशांची लूट केली.https://sindhudurgsamachar.in/ऑस्ट्रेलिया-दौऱ्यासाठी-भ/
याच दरम्यान वडगाव निळा स्टेशनवर तैनात रेल्वे पोलिसांनी धाव घेताच चोरट्यांनी पलायन केले. घटना घडली ते ठिकाण सोनपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असले तरी याबाबत अद्याप तक्रार दाखल करण्यासाठी कुणीही आलेले नसल्याने तक्रार दाखल नसल्याचे परळी रेल्वे पोलिस ठाण्याचे पीएसआय सोमनाथ वाघमोडे यांनी सांगितले. दोन दिवसापूर्वीच घाटनांदुर स्थानकावर प्रवाशांना लुटल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने रे