स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
मुंबई, दि. २ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील विधानभवन परिसरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह विधिमंडळाचे सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या राज्याच्या विकासातील योगदानाला उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.