Kokan: ‘स्वीप’ कलापथकाद्वारे दापोलीत मतदार जनजागृती

0
35
'स्वीप' कलापथक,दापोलीत मतदार जनजागृती,
'स्वीप' कलापथकाद्वारे दापोलीत मतदार जनजागृती

दापोली- महाराष्ट्रात दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दापोली तालुक्यात मतदार जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पंचायत समिती दापोली शिक्षण विभागाच्या वतीने ‘स्वीप’ मतदार जनजागृती कलापथकाची निर्मिती करण्यात आली असून सध्या हे कलापथक दापोली तालुक्यात ठिकठिकाणी फिरून पथनाट्य व मतदार जागृतीपर गीतांच्या सादरीकरणातून मतदार जनजागृती करीत आहे. https://sindhudurgsamachar.in/दाना-चक्रीवादळ-25-ऑक्टोबरल/

दापोलीचे उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, ‘स्वीप’चे नोडल ऑफिसर तथा गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, सहायक बळीराम राठोड आदींचे या कलापथकास मार्गदर्शन व प्रेरणा लाभली असून दापोली पंचायत समिती शिक्षण विभागात कार्यरत असलेले शिक्षक बाबू घाडीगांवकर, संजय मेहता, महेश गिम्हवणेकर, सुनंदा मळगे, संजीवनी लाडे, अस्मिता बालगुडे, स्मिता कदम, विलास साळुंके यांच्या पथनाट्य व मतदार जागृतीपर गीतांना वैजन देवघरकर, महेश शिंदे, नितीन गुहागरकर, सुनील साळुंके, अल्केश नार्वेकर, राजेंद्र पाडवी, राहुल राठोड,आदींची संगीतसाथ लाभली आहे. या कलापथकाच्या सादरीकरणास दापोली तालुक्यात ठिकठिकाणी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून या कलापथकामुळे मतदार जागृती होण्यास फार मोठी मदत होत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here