तृतीयपंथीयांना ‘बीज भांडवल’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
स्वयंरोजगारासाठी शासनाची पुढाकार
मुंबई, दि. २ : तृतीयपंथीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘बीज भांडवल’ योजना सुरू केली असून, पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील प्रशिक्षित तसेच अप्रशिक्षित तृतीयपंथीयांना विविध व्यवसायांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अप्रशिक्षित लाभार्थ्यांना २१ लघुउद्योगांसाठी, तर प्रशिक्षित किंवा अप्रशिक्षित लाभार्थ्यांना १२ इतर व्यवसायांसाठी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पात्रता
-
अर्जदार महाराष्ट्राचा किमान १० वर्षांचा रहिवासी असावा.
-
राष्ट्रीय पोर्टलवर जारी केलेले तृतीयपंथीय ओळखपत्र असणे आवश्यक.
-
लाभार्थ्याचे वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे.
-
लघु, मध्यम किंवा दीर्घ मुदतीच्या कर्ज योजनांपैकी कोणत्याही एका योजनेसाठी अर्ज करता येईल.


