जून २०२६ मध्ये जीएसटी संकलनात १३.९ टक्क्यांची वाढ

0
17
जून २०२६ मध्ये जीएसटी संकलनात १३.९ टक्क्यांची वाढ
जून २०२६ मध्ये जीएसटी संकलनात १३.९ टक्क्यांची वाढ

जून २०२६ मध्ये जीएसटी संकलनात १३.९ टक्क्यांची वाढ

₹१.९४ लाख कोटींचा महसूल

नवी दिल्ली, दि. २ : जून २०२६ मध्ये भारताचे एकूण वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन ₹१,९४,८१२ कोटींवर पोहोचले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १३.९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. आयात-संबंधित महसुलातील ३४.६ टक्के वाढ आणि देशांतर्गत आर्थिक व्यवहारांतील स्थिरतेमुळे जीएसटी संकलनात ही उल्लेखनीय वाढ झाली आहे.
परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर जून २०२६ मधील निव्वळ जीएसटी महसूल ₹१,६२,३७७ कोटी इतका राहिला. यामध्ये देशांतर्गत महसूल ₹१,३४,७७४ कोटी (६.५ टक्के वाढ) तर आयात महसूल ₹६०,०३८ कोटी (३४.६ टक्के वाढ) इतका नोंदविण्यात आला आहे. याच कालावधीत ₹३२,४३६ कोटींचे परतावे वितरित करण्यात आले.
कर घटकांमध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) ₹३७,३७६ कोटी, राज्य जीएसटी (SGST) ₹४५,११६ कोटी आणि एकात्मिक जीएसटी (IGST) ₹१,१२,३२० कोटी इतके संकलन झाले. यामध्ये आयातीवरील ₹६०,०३८ कोटींच्या जीएसटीचा समावेश आहे.
राज्यानुसार महसूल संकलनात महाराष्ट्राने ₹३०,७१४ कोटींच्या संकलनासह देशात प्रथम क्रमांक कायम राखला. त्यानंतर कर्नाटकाने ₹१२,९३७ कोटी, गुजरातने ₹११,७४३ कोटी जीएसटी जमा केला. तर उत्तर प्रदेशात १९ टक्क्यांच्या वाढीसह ₹९,१६५ कोटींचे जीएसटी संकलन नोंदविण्यात आले, ही प्रमुख राज्यांमधील सर्वाधिक वाढ ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here