पुणे, दि. २ : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदभरती प्रक्रियेसंदर्भात उमेदवारांनी केलेल्या तक्रारींची सखोल चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
याबाबत पत्र काढून दिलेला शब्द पाळल्याबद्दल आयुक्त नवल किशोर राम यांचे आमदार रोहित पवार यांनी आभार मानले आहेत.
आमदार पवार यांनी पुढे सांगितले की, भरती प्रक्रियेतील सर्व तक्रारींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही उमेदवाराला नियुक्ती देऊ नये आणि कोणत्याही पात्र उमेदवारावर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी प्रशासन योग्य ती कार्यवाही करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.