विलेपार्लेत ३ ते ५ जुलैदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’

0
62
विलेपार्लेत ३ ते ५ जुलैदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’
विलेपार्लेत ३ ते ५ जुलैदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’

विलेपार्लेत ३ ते ५ जुलैदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’

स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणारे प्रदर्शन

मुंबई, दि. २ : मिशन कोकण साम्राज्य यांच्या वतीने ३ ते ५ जुलै २०२६ या कालावधीत विलेपार्ले येथे ‘कोकणी बाजारपेठ’ या विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील मराठी-कोकणी उद्योजकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
विलेपार्लेत ३ ते ५ जुलैदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’
विलेपार्लेत ३ ते ५ जुलैदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’
या प्रदर्शनात घरगुती उत्पादने, हस्तकला, खाद्यपदार्थ, लाइफस्टाइल वस्तू तसेच विविध आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. यासोबतच ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि कुटुंबासह आनंद घेता येईल, अशी खरेदीची संधी उपलब्ध होणार आहे.
आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या उत्पादनांची खरेदी करून ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमाला बळ द्यावे, असे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण : लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन, नेताजी सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ४०००५७
तारीख : ३, ४ आणि ५ जुलै २०२६
वेळ : सकाळी ११.०० ते रात्री ९.०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here