Kokan: राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात दादा,भाई नको, अर्चनाताई हव्याच- कार्यकर्त्यांनी धरला आग्रह

0
37
अर्चनाताई घारे -परब निवडणूक रिंगणात
सौ. अर्चना घारे परब यांना उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला.

सावंतवाडी मतदार संघात अमूलाग्र बद्दल घडण्याची शक्यता सावंतवाडी (प्रतिनिधी) :– सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात दादा नको, भाई नको, अर्चनाताई हवी अशी जोरदार मागणी करत सौ. अर्चना घारे परब यांना उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली नसल्याने महिलांच्या डोळ्यात अश्रूू उभे राहिले. यावेळी सौ. अर्चना घारे परब यांनी निष्ठावंत, अस्मितेची लढाई आहे. आपणा सर्वांचा आशिर्वाद असल्याने मी आज उमेदवारी भरत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी महिलां भावनाविवश झाल्या. https://sindhudurgsamachar.in/kokan-आता-माघार-नाही-रडायचं-ना/

वैश्य भवन येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सौ. अर्चना घारे परब, सामाजिक कार्यकर्ते ऍड नकुल पार्सेकर, पुंडलिक दळवी, प्रदीप चांदेलकर, योगेश कुबल, संदीप गवस, सौ. दीपिका राणे, ऍड नकुल पार्सेकर, सौ. ममता नाईक, सौ पूजा दळवी, सौ. सिद्धी परब, देवेंद्र टेमकर, याकुब शेख, नियाज शेख, काशिनाथ दुभाषी, फैजान शेख, सुदेश तुळसकर, हिदायतुल्ला खान, संजय भाईप, अजित नातू, भावतीस फर्नांडिस, सौ. मारिता फर्नांडिस, सौ. गौरी गावडे, सौ. कोरगावकर, सुनिता भाईप, कृष्णा नाईक, विनायक परब, सौ. नितीशा नाईक, सुधा सावंत, ऍड. सायली दुभाषी, संतोष जोईल, नवल साठेलकर, ऋत्विक परब, विवेक गवस, सूर्यकांत धरणे, बंटी कांबळे, सत्यवान साटेलकर, तौसीफ आगा, नारायण आसोलकर, सूर्याजी नांगरे, विशाल बागायतकर, विलास सावळ व महादेव देसाई, गौतम महाले, साबाजी देसाई, सागर नाईक आदी उपस्थित होते.

सौ.अर्चना घारे परब म्हणाल्या, माहेरवाशीण आहे. त्यामुळे मला भरपूर आस्था आहे. तुम्ही सर्व माझ्या सोबत आहात हे माझे भाग्य समजते. प्रवेश होतोय, तिकीट कापले जाईल असे वाटले. मुंबईत ठाण मांडून बसले. आमच्या वरिष्ठांनी जोरदार प्रयत्न केला. पण महाविकास आघाडीचा निर्णय झाला. माझ्या पदरात तिकीट पडले नाही. वाईट वाटले, सर्वांनी बोलावं म्हणून मेळावा झाला. लढले पाहिजे, पण मी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नाराजी नाही. मात्र अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. अस्मितेची लढाई आहे. सन २०१९ मध्ये माघार घेतली आज निष्ठावंताची, अस्मितेची लढाई आहे. मी तुमच्या सोबत अहोरात्र आहे. माझ्या विकासाचा रोड मॅप आहे. माझा मुलग्याला नाही तर मतदार संघात वेळ दिला. निष्ठावंत विरोधात गद्दार अशी निवडणूक होईल असे वाटत होते. पण ही निवडणूक गद्दार विरोधात गद्दार अशी निवडणूक होईल, असे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे. पण ही निवडणूक प्रतिष्ठेची, निष्ठावंताची अस्मितेची आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, सत्यता पडताळून साथ द्या. सामाजिक कार्यकर्ते ऍड नकुल पार्सेकर म्हणाले, राजकीय चिखल या मतदारसंघात झाला आहे. त्यामुळे सौ. अर्चना घारे परब या पर्यायाचा विचार करून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. गद्दार विरोधात गद्दारला पर्याय अर्चना घारे परब आहेत. गोडबोल्या येतील त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. संस्था डबघाईस येण्यास जबाबदार असलेल्या या गोडबोल्याला थारा देऊ नका. आडाळी एमआयडीसी विकास झाला नाही याला जबाबदार हेच आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here