दापोली, खेड व मंडणगडमधील वीज वितरण आणि प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

0
44
दापोली, खेड व मंडणगडमधील वीज वितरण आणि प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करा - ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश

रत्नागिरी, दि. ३ : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यांतील वीज वितरण व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि प्रलंबित विकासकामे नियोजनबद्ध पद्धतीने निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आढावा बैठकीत विविध वीज प्रकल्प, वितरण व्यवस्था आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी दापोली येथे नव्या वीज उपकेंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करून त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही राज्यमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या जुन्या वीजवाहक लाईन्स सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यालगत स्थलांतरित करण्याबाबत नियोजन करण्याची सूचना केली. त्यामुळे वीजपुरवठ्याची विश्वासार्हता वाढण्यास आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
या बैठकीस महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढीकर, संचालक डी. व्ही. पडळकर, सतीश चव्हाण, कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक जगदाळे, मुख्य अभियंते डोळेकावळे यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here