‘शिक्षक पात्रता परीक्षा : सध्याचे स्वरूप व पुनर्रचना’ विषयावर ११ जुलै रोजी शिक्षण कट्टा

0
22
'शिक्षक पात्रता परीक्षा : सध्याचे स्वरूप व पुनर्रचना' विषयावर ११ जुलै रोजी शिक्षण कट्टा
'शिक्षक पात्रता परीक्षा : सध्याचे स्वरूप व पुनर्रचना' विषयावर ११ जुलै रोजी शिक्षण कट्टा

‘शिक्षक पात्रता परीक्षा : सध्याचे स्वरूप व पुनर्रचना’ विषयावर ११ जुलै रोजी शिक्षण कट्टा

नाशिक, दि. ४ : शिक्षण विकास मंच, नाशिक यांच्या वतीने ‘शिक्षक पात्रता परीक्षा : सध्याचे स्वरूप व पुनर्रचना’ या विषयावर शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी शिक्षण कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आयएमआरटी), गंगापूर रोड, नाशिक येथे होणार असून सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक म्हणून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य केली आहे. मात्र, या परीक्षेचे स्वरूप कसे असावे याबाबत निश्चित निकष नसल्याने केंद्र व राज्य सरकारांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबाबत सातत्याने चर्चा होत आहे. अलीकडील पेपरफुटीच्या घटनेनंतर या परीक्षेच्या विश्वासार्हतेसह तिच्या रचनेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षेचे विद्यमान स्वरूप, त्यातील त्रुटी आणि आवश्यक सुधारणा यावर सखोल चर्चा करण्यासाठी या शिक्षण कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक भाऊ चासकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून या विषयावरील आपले विचार आणि अनुभव मांडणार आहेत.
या चर्चासत्रात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, पत्रकार, पालक तसेच शिक्षण क्षेत्रात रुची असलेल्या नागरिकांना सहभागी होता येणार आहे. आयोजकांनी इच्छुकांनी पूर्वनोंदणी करून कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पूर्वनोंदणीसाठी गुगल फॉर्म : https://forms.gle/svQvPAzW1dDkbQbV9
अधिक माहितीसाठी :
  • विवेक खैरनार – ९४२००८१०५१
  • वैभव तुपे – ८२७५५१८८९०
    (शिक्षण कट्टा समन्वयक, नाशिक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here