रेल्वेत ६,५६५ तांत्रिक पदांची मेगाभरती; २९ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी
रेल्वेत ६,५६५ तांत्रिक पदांची मेगाभरती; २९ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी
आरआरबीकडून ‘टेक्निशियन ग्रेड-१ सिग्नल’ आणि ‘टेक्निशियन ग्रेड-३’ पदांसाठी अधिसूचना जाहीर
नोकरी विशेष | प्रतिनिधी
रेल्वेत सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRBs) ‘टेक्निशियन ग्रेड-१ सिग्नल’ आणि ‘टेक्निशियन ग्रेड-३’ या पदांच्या एकूण ६,५६५ रिक्त जागांसाठी केंद्रीकृत रोजगार अधिसूचना (CEN) क्र. ०२/२०२६ प्रसिद्ध केली आहे.
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ग्रुप ‘C’ तांत्रिक पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू : ३० जून २०२६
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २९ जुलै २०२६
भरतीचा तपशील
भरती संस्था : रेल्वे भरती मंडळ (RRB)
जाहिरात क्रमांक : CEN No. 02/2026
पदे :
टेक्निशियन ग्रेड-१ सिग्नल
टेक्निशियन ग्रेड-३
एकूण रिक्त जागा : ६,५६५
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, रिक्त जागांचा तपशील, अधिकृत अधिसूचना (PDF) तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
रेल्वेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह वेळेत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.