आंदुर्ले ग्रामपंचायतीचा ५४ वा स्थापना दिन उत्साहात

0
56
आंदुर्ले ग्रामपंचायतीचा ५४ वा स्थापना दिन उत्साहात
आंदुर्ले ग्रामपंचायतीचा ५४ वा स्थापना दिन उत्साहात

आंदुर्ले ग्रामपंचायतीचा ५४ वा स्थापना दिन उत्साहात

गावाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्यांचा गौरव

आंदुर्ले | प्रतिनिधी
आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या स्थापनेला ४ जुलै रोजी ५४ वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने गावात स्थापना दिनाचा उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्ताने सर्व ग्रामस्थ, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान पदाधिकारी तसेच आजी-माजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, स्थापना दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
गेल्या ५४ वर्षांत आंदुर्ले ग्रामपंचायतीने गावाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा विकास तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामपंचायतीने गावाच्या प्रगतीचा मजबूत पाया घातला आहे.
माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या कार्यकाळात विकासाची दिशा निश्चित केली, तर विद्यमान कार्यकारिणी हा विकासाचा वारसा पुढे नेत गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनीही आपल्या कर्तव्यनिष्ठेने ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत ठेवण्यात आणि नागरिकांना सेवा देण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि लोकसहभागामुळे आंदुर्ले गावाने विकासाची अनेक टप्पे यशस्वीरीत्या पार केले असून, आगामी काळातही गावाने सर्वांगीण प्रगती करत आदर्श ग्रामपंचायत म्हणून राज्यात नावलौकिक मिळवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दैनिक सिंधुदुर्ग समाचार परिवाराकडून आंदुर्ले ग्रामपंचायतीस ५४ व्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच भविष्यातील विकासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here