Kokan: आ. वैभव नाईकांकडून भाजपला दे धक्का सुरूच

0
12
आ. वैभव नाईकांकडून भाजपला दे धक्का सुरूच
सुकळवाड मधील कट्टर राणे समर्थक भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हसकर यांनी हाती घेतली मशाल

सुकळवाड मधील कट्टर राणे समर्थक भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हसकर यांनी हाती घेतली मशाल भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरुच

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे. निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजप आणि आता स्वतःच्या उमेदवारीच्या स्वार्थासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ज्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना आधार दिला होता त्यांचा विश्वासघात करत भाजप पक्षातून शिंदे गटात उडी मारली आहे त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज होऊन निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत. आज मालवण तालुक्यातील सुकळवाड गावातील कट्टर राणे समर्थक भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हस्कर व भाजपचे प्रमुख कार्यकर्ते प्रसाद भालेकर तसेच तळगाव मधील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत व त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे स्वागत केले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-आ-वैभव-नाईक-व-माजी-आ-परशुर/

यावेळी बोलताना माजी उपसरपंच सुभाष म्हसकर म्हणाले कुडाळ-मालवण मतदारसंघात उमेदवारीसाठी भाजप पक्ष इच्छुक असताना देखील हा मतदार संघ शिंदे गटासाठी सोडला गेल्यामुळे आपण नाराज झालो असून आ.वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन सुकळवाड गावातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते सुकळवाड व तळगाव गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.उमेदवारीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिंदे गटाबाबत असलेली खदखद आता उघड होत आहे.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी आहे त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी सुकळवाड-तळगाव मधील प्रवेशकर्त्यांना दिला आहे. यावेळी सुकळवाड गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते प्रसाद भालेकर,ऋषिकेश तारवे,राजेश वायंगणकर,जगन्नाथ हिंदळेकर तर तळगाव गावातील सहदेव दळवी,महादेव मेस्त्री,लक्ष्मण दळवी,शशिकांत गावडे या प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, उपतालुका प्रमुख पराग नार्वेकर उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले विभाग प्रमुख विजय पालव,प्रज्ञा चव्हाण, उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण,रुपेश वर्दम,बाबली पालव,तळगाव सरपंच लता खोत, सुकळवाड उपसरपंच सचिन पावसकर,गावराई उपसरपंच संतोष सामंत,तळगाव माजी उपसरपंच अनंत चव्हाण,प्रसाद दळवी,सुकळवाड शाखाप्रमुख प्रल्हाद वायंगणकर,ग्रा.सदस्य वृषाली गरुड, ग्रा.सदस्य अविनाश गरुड,सुनील पाताडे,प्रशांत केळवलकर,समीर वायंगणकर,गोपाळ वांगणकर,मोरेश्वर मसुरकर,अनिल पालकर,दादा पाताडे भाऊ पाताडे,हेमंतकुमार पाताडे, उमेश पाताडे,भरत केळवलकर,प्रसाद मुसळे,अक्षय राणे,संतोष गरुड,अर्जुन अटक, स्वप्निल घोगळे,वैभव घोगळे आदि शिवसैनिक उपस्थित होते.

     कुडाळ-मालवण विधानसभा  मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि  शिंदे  गटात  शीतयुद्ध रंगले आहे. निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजप आणि आता  स्वतःच्या उमेदवारीच्या स्वार्थासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ज्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना आधार दिला होता त्यांचा विश्वासघात करत भाजप  पक्षातून शिंदे गटात उडी  मारली  आहे त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज होऊन निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत. आज मालवण तालुक्यातील सुकळवाड  गावातील कट्टर राणे समर्थक भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हस्कर व भाजपचे प्रमुख  कार्यकर्ते प्रसाद भालेकर तसेच तळगाव मधील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत व त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून  पक्षात त्यांचे स्वागत केले आहे.
  यावेळी बोलताना माजी उपसरपंच सुभाष म्हसकर म्हणाले कुडाळ-मालवण मतदारसंघात उमेदवारीसाठी भाजप पक्ष इच्छुक असताना देखील हा मतदार संघ शिंदे गटासाठी सोडला गेल्यामुळे आपण नाराज झालो असून आ.वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन सुकळवाड गावातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते सुकळवाड व तळगाव  गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.उमेदवारीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिंदे गटाबाबत  

असलेली खदखद आता उघड होत आहे.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी आहे त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी सुकळवाड-तळगाव मधील प्रवेशकर्त्यांना दिला आहे.
यावेळी सुकळवाड गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते प्रसाद भालेकर,ऋषिकेश तारवे,राजेश वायंगणकर,जगन्नाथ हिंदळेकर तर तळगाव गावातील सहदेव दळवी,महादेव मेस्त्री,लक्ष्मण दळवी,शशिकांत गावडे या प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, उपतालुका प्रमुख पराग नार्वेकर उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले विभाग प्रमुख विजय पालव,प्रज्ञा चव्हाण, उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण,रुपेश वर्दम,बाबली पालव,तळगाव सरपंच लता खोत, सुकळवाड उपसरपंच सचिन पावसकर,गावराई उपसरपंच संतोष सामंत,तळगाव माजी उपसरपंच अनंत चव्हाण,प्रसाद दळवी,सुकळवाड शाखाप्रमुख प्रल्हाद वायंगणकर,ग्रा.सदस्य वृषाली गरुड, ग्रा.सदस्य अविनाश गरुड,सुनील पाताडे,प्रशांत केळवलकर,समीर वायंगणकर,गोपाळ वांगणकर,मोरेश्वर मसुरकर,अनिल पालकर,दादा पाताडे भाऊ पाताडे,हेमंतकुमार पाताडे, उमेश पाताडे,भरत केळवलकर,प्रसाद मुसळे,अक्षय राणे,संतोष गरुड,अर्जुन अटक, स्वप्निल घोगळे,वैभव घोगळे आदि शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here