Home कोकण पळस्पे फाटा येथे मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे बंद; कोकणाकडे जाणारी वाहतूक रोखली
पळस्पे फाटा येथे मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे बंद; कोकणाकडे जाणारी वाहतूक रोखली
मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
पनवेल, दि. ६ जुलै :
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पळस्पे फाटा (पनवेल) येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील गावांकडे जाणाऱ्या वाहनांना पळस्पे फाट्यापुढे जाऊ दिले जात नसून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक थांबविली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आणि मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, कोकणाकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवास करावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.