मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ दरड कोसळल्याने प्रकल्प तात्पुरता बंद

0
17
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प तात्पुरता बंद; दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प तात्पुरता बंद; दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ दरड कोसळल्याने प्रकल्प तात्पुरता बंद

प्रकल्पाच्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याची माहिती 

पुणे–मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी

खालापूर, दि. ७ जुलै :
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रकल्प परिसरातील कामकाज आणि हालचाल तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच सुरुवातीच्या भागात काही प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित यंत्रणांनी प्रकल्प परिसर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या परिस्थितीचा परिणाम पुणे–मुंबई मार्गावरील वाहतुकीवर झाला असून, विशेषतः मालवाहतूक आणि प्रवासी वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, संबंधित यंत्रणांकडून नुकसानाचा आढावा घेण्याचे काम सुरू असून, सुरक्षितता सुनिश्चित झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.  प्रकल्पाच्या नुकसानीचे स्वरूप आणि वाहतुकीवरील परिणामाबाबत संबंधित प्रशासनाकडून अधिकृत माहिती येणे अपेक्षित असून, त्यानुसार पुढील तपशील स्पष्ट होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here