Kokan: दिपक केसरकर यांचा म्हापण जिल्हा परिषद मतदार संघाचा गाव भेट दौऱ्याचा शुभारंभ

0
24
दिपक केसरकर ,म्हापण जिल्हा परिषद मतदार संघ
दिपक केसरकर यांचा म्हापण जिल्हा परिषद मतदार संघाचा गाव भेट दौऱ्याचा शुभारंभ

श्री.देव आदीनारायण मंदिर परुळे येथे श्रीफळ ठेवून प्रचारास प्रारंभ

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /म्हापण/संदिप चव्हाण-:

शिवसेना, भाजप , आणि राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई पक्षाचे महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांचा म्हापण जिल्हा परिषद मतदार संघाचा गाव भेट दौऱ्याचा शुभारंभ श्री.देव आदीनारायण मंदिर परुळे येथे श्रीफळ ठेवून करण्यात आला.यावेळी या दौऱ्याला मतदार संघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी माजी पंचायत समिती सभापती निलेश सामंत, भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये, सरपंच सौ.वायंगणकर, सोनाली केसरकर, दिशा शेटकर,माजी पं.स.सदस्या वंदना किनळेकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत ,म्हापण उपसरपंच सुरेश ठाकूर, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई,माजी सरपंच महेश सामंत, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, विभाग प्रमुख देवदत्त साळगावकर,माजी जि‌.प.शिक्षण व आरोग्य सभापती विकास गवंडे, शितल साळगावकर,दादा कुबल,अवी देसाई, वसंत तांडेल,कोचरे सरपंच योगेश तेली, उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर,माजी सरपंच विष्णु फणसेकर,माजी पं.स.सदस्य गौरवी मडवळ,म्हापण ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मडवळ, विलास राऊळ पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदार ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/डोनाल्ड-ट्रम्प-यांचा-विज/

यावेळी बोलताना केसरकर यांनी आपण केलेल्या विविध प्रकारच्या विकास कामांचा दाखल देत पूर्वी चालू करण्यात आलेली चांदा ते बांदा योजना तसेच सध्या चालू असलेल्या सिंधू रत्न योजनेतून आपल्या घरोघरी खऱ्या अर्थाने समृद्धी राबेल, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून भगिनींना आर्थिक हातभार लाभला.त्याचप्रमाणे लोक माझ्या वर टीका करण्याचे काम करत असून मी मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडून श्रेय घेतात अशी टीका राजन तेली यांच्या वर केली.तसेच काही लोक शेतकरी यांच्या सह्या घेऊन खोटी ॲफिडेव्हिड करुन जमिनी लाटत असून त्याचा मोबदला देखिल देत नाहित अशी विखारी टीका नाव न घेता विशाल परब यांच्या वर केले.तर एक उमेदवार पुण्यात राहुन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे काम पाहणार का? असा सवाल करत अर्चना परब यांच्यावर तोफ डागली.ज्या दिवशी तरुण हुशार व्यक्तीमत्व या मतदारसंघांची जबाबदारी आपल्या खांद्या घेऊन पार पाडण्यासाठी तयार होईल त्यावेळी या मतदारसंघाची जबाबदारी मी सोडेन.आपण तीन वेळा मला आपली सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिलात त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मला संधी द्या. येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघासाठी वेळ देवून आपले काही अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करण्याची पुन्हा एकदा संधी मला द्यावी.असे भावनिक आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here