Kokan: दीपक केसरकरांचा विश्वास; मुद्दे नसल्यामुळे विरोधक नाहक टीका करत सुटलेत

0
16
दीपक केसरकर,
चांगल काम केल आहे, त्यामुळे यावेळचा माझा विजय भव्यदिव्य असेल...हे निश्चित -दीपक केसरकरा

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/वेंगुर्ले,ता.११:

गेल्या पंधरा वर्षात मतदार संघासाठी केलेले काम तुमच्यासमोर आहे. मी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला. त्यामुळे यावेळचा माझा विजय भव्यदिव्य असेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान माझा मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची मी कायम काळजी घेतली. त्यामुळे विरोधकांना कोणतेही मुद्दे नसल्यामुळे ते टीका करत सुटले आहेत. परंतु येथील जनता त्यांना नक्कीच जागा दाखवेल, असे ते म्हणाले. https://sindhudurgsamachar.in/kokan-आकेरी-गावातील-युवकांनी-आ/

श्री. केसरकर यांचा तुळस व आडेली गावभेट दौरा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जि. प. चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती विष्णुदास उर्फ दादा कुबल, माजी जि. प. सदस्य नितीन शिरोडकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सुहास कोळसुलकर, तुळस सरपंच रश्मी परब, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, माजी उपसरपंच जयवंत तुळसकर, भाजपचे सुधीर झांटये, भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, तुळस उपसरपंच सचिन नाईक, भाजपाचे अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पेडणेकर, तुळस विभाग प्रमुख संजय परब, भूषण आंगचेकर, भाजप युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, शिवसेना तालुका संघटक बाळा दळवी, सेनेच्या तालुका महिला संघटक दिशा शेटकर, उपतालुकाप्रमुख देवा कांबळी, सोसायटी चेअरमन मकरंद परब, भाजप गाव अध्यक्ष सुधाकर परब, मातोंड ग्रामपंचायत सदस्या किशोरी परब, सुजाता सावंत, आर्या रेडकर, सोसायटी संचालक दीपाली परब, रामदास रेडकर, वासु कोंडये आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here