Kokan: शिंदे गट आणि भाजपच्या बुथ प्रमुखांसह मालवणमध्ये कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल !

0
11
मालवणमध्ये कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल !
शिंदे गट आणि भाजपच्या बुथ प्रमुखांसह मालवणमध्ये कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल !

शिंदे गटाचे मालवण तालुकाप्रमुख महेश राणे यांच्या असरोंडी गावात निलेश राणेंना मोठा धक्क

 भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत. शनिवारी मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील शिंदे गटाचे बुथ अध्यक्ष कमलेश गावडे व भाजप बुथ अध्यक्ष मोहन सावंत यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला व मशाल हाती घेतली.आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-गोठोस-गावातील-भाजप-कार्य/


यावेळी श्रीकांत घाडी, विलास मेस्त्री,प्रकाश सावंत,उज्वला मोहन सावंत या भाजप-शिंदे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख बंडू चव्हाण, विभाग समन्वयक संजय पारकर, बाबा सावंत, प्रशांत सावंत, सरपंच अनंत पोईपकर,उपसरपंच आदित्य सावंत, युवासेना शाखाप्रमुख दयानंद कदम,शाखा प्रमुख सुनील सावंत,दिलीप घाडीगावकर, ग्रा.सदस्य अजय गावडे,ग्रा.सदस्य संदीप सावंत, प्रमोद सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here