🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार / सावंतवाडी– शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. “ही माझी शेवटची निवडणूक आहे. माझा राजकीय वारसदार मुलगी सोनाली नाही,” असे सावंतवाडी विधानसभेचे उमेदवार दीपक केसरकर म्हणाले. दि. १७ नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. https://sindhudurgsamachar.in/पृथ्वीच्या-भूगर्भात-सापड/
“लवकरच वारसदार ठरवण्यात येईल. वारसदार सेना-भाजप कोणाचाही असेल ते त्यांचे ठरवतील. वारसदार हा पक्षाचा पुढचा होणारा उमेदवार असणार आहे. माझ्या सामाजिक कामाची वारसदार सोनाली आहे. ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे,” असे ते म्हणाले. राज्याच्या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. यामध्ये आपल्याला अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. याच अंतिम टप्प्यावर महायुतीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपक केसरकर यांनी त्यांची ही शेवटची निवडणूक असल्याची घोषणा केली.
या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सोनाली केसरकर व मुलगा सुरज केसरकर होते. सुरज व सोनाली हे त्यांचे राजकीय वारसदार नाही असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. “सोनाली ही माझ्या सामाजिक कार्याची वारसदार आहे. ती आमच्या कुटुंबाची परंपरा आहे. तिचं काम हे गोरगरिबांच्या हितासाठी असेल. ती चांगली उद्योजिका बनेल. परंपरा म्हणून मला राजकारण मिळाले नाही. सामाजिक वारशातून मी राजकारणात आलो.” असेही ते म्हणाले.