जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत व उपाध्यक्ष दादा साईल यांची हुमरमळा ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट 

0
59

कुडाळ, वार्ताहर:
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांनी हुमरमळा-वालावल ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देऊन ग्रामपंचायतीमधील विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे आणि सरपंच अमृत देसाई यांनी गुलाबाची रोपे देऊन दोन्ही मान्यवरांचा सन्मान केला.
हुमरमळा-वालावल ग्रामपंचायतीच्या कादैनिक सिंधुदुर्ग समाचारमांचे कौतुक मी ऐकून होतो. आज प्रत्यक्षात ग्रामपंचायतीला भेट देण्याचा योग आला. ग्रामपंचायत इमारत आणि विकासकामांचा आढावा घेतला असता या ग्रामपंचायतीचे काम समाधानकारक आहे, असे गौरवोद्गार अध्यक्ष प्रमोद कामत यांनी काढले. ते पुढे म्हणाले, “ग्रामपंचायतीचे कामकाज पाहून समाधान वाटले.”
या ग्रामपंचायतीचे काम समाधानकारक आहे. शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेकडे अनेक योजना आहेत. शेतकऱ्यांना योजनांचा फायदा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करा, अशा सूचना उपाध्यक्ष दादा साईल यांनी ग्रामसेविका अपर्णा पाटील यांना दिल्या.
यावेळी ग्रामसेविका अपर्णा पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांचे विशेष आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here