कृषी दिनी तेंडोलीत कृषिकन्यांचा धमाका! BRC येथे सुरू केले गांडूळ खत युनिट

0
54

शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन

कुडाळ, वार्ताहर:
कृषी दिनाचे औचित्य साधून उद्यानविद्या महाविद्यालय मूळदेच्या कृषिकन्या गटाने तेंडोली येथील BRC युनिटमध्ये गांडूळ खत प्रकल्पाचा शुभारंभ केला.
विद्यार्थिनी कु. पल्लवी दाभोलकर, कु. नेहा प्रभुतेंडोलकर, कु. निकिता प्रभुतेंडोलकर, कु. प्रतीक्षा सुर्वे, कु. सृष्टी पेंडूरकर, कु. तन्मयी भगत, कु. पूर्वा मुरकर व कु. सिद्धी चौधरी यांनी एकत्र येत हा प्रकल्प सुरू केला. यावेळी तेंडोलीतील शेतकऱ्यांना व बचत गटातील महिलांना गांडूळ खत निर्मितीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सेंद्रिय शेतीला चालना देणे व शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्तम खत उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश आहे. कृषिकन्यांच्या या उपक्रमाचे गावातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here