पावसाचा कहर! माड कोसळून रस्ता बंद, वीजवाहिन्या तुटल्या. ग्रामस्थांचे हाल, प्रशासनाला जाग कधी?

0
54

कुडाळ, आंदुर्ले:
कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावातील धुरीवाडी येथे मुसळधार पावसाने झोडपले असून जोरदार वाऱ्यामुळे माडाचे झाड मोडून रस्त्यावर कोसळले. माड कोसळताना वीजवाहिन्याही तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री ही घटना घडली. रस्त्यावर चिखल व पाणी साचल्याने आणि माड आडवा पडल्याने ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तुटलेल्या वीजवाहिन्यांमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून धोका निर्माण झाला आहे.
स्थानिकांनी तातडीने वीज वितरण कंपनी व प्रशासनाला कळवले आहे. मात्र अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नाही. वायरमन नॉट रिचेबल असल्याने हुमरमळा येथील कार्यालयाला कळवूनही तुटून पडलेल्या वायरी हटवून धुरीवाडीचा रस्ता मोकळा केला गेला नाही. त्यामुळे रस्ता मोकळा करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here