आळवाडा अंगणवाडीची दयनीय अवस्था; चिमुकल्यांचे हाल

0
25
आळवाडा अंगणवाडीची दयनीय अवस्था; चिमुकल्यांचे हाल
आळवाडा अंगणवाडीची दयनीय अवस्था; चिमुकल्यांचे हाल

आळवाडा अंगणवाडीची दयनीय अवस्था; चिमुकल्यांचे हाल 🔴

बांदा/आळवाडा:
प्राप्त माहीती नुसार  बांदा-आळवाडा येथील अंगणवाडीच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. गेले अनेक महिने चिमुकल्यांसाठी असलेल्या शौचालयाचे पत्रे उखडून गेले आहेत. त्यामुळे मुलांची मोठी गैरसोय होत आहे.
तसेच जवळपास वर्षभरापासून अंगणवाडीचा समोरील दरवाजा फुटलेल्या अवस्थेत आहे. अंगणवाडीच्या आत मध्ये देखील पाण्याची कोणत्याही प्रकारची सोय उपलब्ध नाही.
यामुळे चिमुकल्या बालकांचे व अंगणवाडी सेविकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here