⭐१ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान होणार परीक्षा
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /मुंबई-: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर केली असून १ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांना १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील.विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये सहायक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप अँड असिस्टंट प्रोफेसर निवडण्यासाठी यूजीसी नेट ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मुंबई-मुलींच्या-क्रिकेट/
एनटीएकडून ८५ विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाते. देशभरातील विविध केंद्रावर ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेतली जाणार आहे.त्याचे वेळापत्रक एनटीएने जाहीर केले आहे. त्यानुसार या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर असेल.या अर्जासोबत परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची अंतिम मुदत ११ डिसेंबर दिली आहे. तर उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशील सुधारण्यासाठी १२ डिसेंबर आणि १३ डिसेंबरची मुदत असेल, असे एनटीएने जाहीर केले आहे. दरम्यान या परीक्षेची केंद्र आणि शहर तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र देण्याची तारीख एनटीएकडून नंतर जाहीर केली जाणार आहे. तसेच परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही नंतर जाहीर केले जाईल.