🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार -शिरगाव (तालुका देवगड)
येथील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सहशिक्षक हेमंत सावंत यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार गोवा येथील शिक्षक विकास परिषदेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
हेमंत सावंत यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या विद्यासंपन्न व समर्पित कार्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवा आयाम मिळाला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन गोवा येथील कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. सामाजिक कार्यकर्ते संजय साळ, अरविंद नाईक आणि इतर मान्यवरांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली होती.https://sindhudurgsamachar.in/kokan-देऊळवाडा-वी-का-स-सेवा-सोस/
शिक्षक विकास परिषदेने सावंत यांना सन्मानित करताना त्यांच्या शिक्षकितेतील नवनवीन उपक्रम आणि योगदानाचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या या पुरस्कारामुळे शिरगाव तालुक्याचा सुद्धा गौरव झाला असून त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे .
त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल आज शिरगाव हायस्कूल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने संस्थेचे अधीक्षक मा श्री संदीप साटम साहेब यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले या वेळी शाळेचे पर्यवेक्षक श्री यू जे रावराणे सर्व व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते
[…] […]