🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार – -देवरुख/प्रतिनिधी-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या संगनमताने जो इ व्ही एम हॅक करून महाविकास आघाडीचे सुमारे 89 ऊमेदवारांचा पराभव घडवून आणला आणि त्या मुळे राज्यात महाविकास आघाडीवर आणि मतदार असणाऱ्या जनतेवर जो अन्याय झला आहे. त्या मुळे जनतेवर होणाऱ्या अन्याया विरुध्द आणि जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन जनतेत जातियवाद , धर्मवाद निर्माण करणाऱ्या यंत्रेने विरुद्ध आणि जुलमी केंद्र सरकार , राज्य सरकार विरुद्ध काँग्रेस संघर्ष करण्यासाठी आता रस्तावर उतरणार गावा गावात वाडी वार बैठका घेऊन जनतेला संघटीत करणार असे रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव जाधव यानी जाहिर केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्गची-शान-कु-आर्/
या वेळी सर्व काँग्रेस कार्यकर्तोंना अशोकराव जाधव यानी सांगितले केले की सदर संघर्ष यात्रा काँग्रेसचे जेष्ठ नेते महादेवजी चव्हाण यांचे नेतृत्वा खाली निघणार आहे .आता काँग्रेसला रस्तावर उतरण्या शिवाय पर्याय नाही . मा . राहुलजी गांधी यांचे आदेशा प्रमाणे काँग्रेसने जनहिताचे कार्यक्रम आणि सर्वसामान्य जनतेवर विविध प्रश्ना संदर्भात होणाऱ्या अन्याया विरोधात संघर्ष करण्यासाठी या पुढे आदेशांची वाट पाहू नका त्यामुळे पक्षातील पदाधि कऱ्यानीं संघर्ष सुरु करणे आत्यंतिक आवश्यक आहे . पक्षाच्या कार्यकर्ताने जनतेचे न्याय प्रश्न मांडण्यासाठी , संघर्ष करणे आवश्यक असलेचे प्रतिपादन अशोकराव जाधव यानी मोडले . तेव्हां त्यांचे सोबत अनंत जाधव , अशोक पवार , अनंत धामणे, यशवंत चांदे , उत्तम गायकवाड , मोहन सनगरे , दिपक संसारे , फारुख मुकादम , सुवर्णा कातकर, रश्मी कदम माजी सरपंच , जगदीश रेवाळे, प्रफुल्ल माने , संतोष चाळके , पुनम विचारे, मुरलीधर पांचाळ , पाडूरंग रहाटे, आदित्य शेलार, मृणालिनी दांडेकर, सुचय डोंगरे इत्यादी बहूसंख्य काँग्रेस कार्यकर्ते संघर्ष यात्रेच्या नियोजन सभेत उपस्थित होते .सभे मध्ये संघर्ष यात्रेचे नियोजन आणि संपूर्ण जिल्हा मार्ग ठरविणेचे काम आणि नेतृत्व मा. महादेव चव्हाण यानी आणि काँग्रेस पक्षातिल सहकाऱ्यांना घेऊन करणेचे ठरले आहे . संघर्ष यात्रेची सुरवात आणि समाप्ती ची तारीख येत्या चार दिवसात जाहिर केली जाईल असे अशोकराव जाधव यानी सांगितले .