Kokan: राजापुरात ४ जानेवारीला बैलगाडा स्पर्धा

0
8
राजापुरात ४ जानेवारीला बैलगाडा स्पर्धा
राजापुरात ४ जानेवारीला बैलगाडा स्पर्धा

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l राजापूर l 17 डिसेंबर

तालुक्यातील श्री गणेश आडिवरेकर मित्रमंडळातर्फे किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने ४ जानेवारीला राजापुरात बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धा राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अशा तीन गटांत घेतल्या जाणार आहेत. राजापूर रोड रेल्वेस्टेशननजीक असलेल्या जांभवलीच्या माळावर या स्पर्धा आयोजित केल्या असून, सकाळी ९ वा. उद्घाटन व सायं ५ वा. आमदार किरण सामंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-गड-किल्ल्यांवर-गैरकृत्/

स्पर्धेतील राज्यस्तरीय प्रथम विजेत्याला पारितोषिक ५१ हजार व मानाची ढाल, द्वितीय पारितोषिक २५ हजार व मानाची ढाल, तृतीय पारितोषिक १५ हजार व मानाची ढाल. जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक ३१ हजार व मानाची ढाल, द्वितीय पारितोषिक १५ हजार व मानाची ढाल, तृतीय पारितोषिक १० हजार व मानाची ढाल. तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक १० हजार व मानाची ढाल, द्वितीय पारितोषिक ५ हजार व मानाची ढाल, तृतीय पारितोषिक ३ हजार व मानाची ढाल अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

शर्यतीचे आयोजक केळवली विभागप्रमुख नाना कोरगावकर व पाचल विभागप्रमुख शैलेश साळवी असून, अधिक माहितीसाठी नाना कोरगावकर, प्रल्हाद नारकर, प्रवीण कानडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here