पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्गातील ३,६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

0
13
सिंधुदुर्गातील ३,६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध
सिंधुदुर्गातील ३,६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्गातील ३,६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करावे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण अनिवार्य

सिंधुदुर्ग, दि. २८ :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ हजार ६७४ शेतकरी या यादीत समाविष्ट आहेत. पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ मिळवावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रदीप मालगावे यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण अनिवार्य
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण अनिवार्य
प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये जिल्ह्यातील ४२० गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील २,७५७ तर राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकांशी संबंधित ९१७ अशा एकूण ३,६७४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही गावनिहाय यादी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा सीएससी केंद्रात जाऊन नोंदणी पूर्ण करावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळील आपले सरकार केंद्र, महा ई-सेवा केंद्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा किंवा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, कर्ज खात्याचे पासबुक आणि बचत खात्याचे पासबुक सोबत आणणे बंधनकारक आहे.
आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रक्रिया जिल्हाभरात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली असून कोणत्याही केंद्रावर यासाठी शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची रक्कम अदा करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
योजनेचा लाभ वेळेत मिळावा यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here