⭐ कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, ओरोस येथे प्रयोगांचे आयोजन. –
⭐ सिंधुकन्या प्रिती सावंत -शिंदे यांचा चमुसह नृत्याविष्कार.
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ l मनोज ना. देसाई
मराठीतील अजरामर कलाकृती’,गीत रामायणावर ‘ आधारित नृत्यनाटीका कुडाळची सुकन्या सौ. प्रीती सावंत-शिंदे यांनी बसवली आहे. दशरथ राजापासून लव – कुशांपर्यंन्तच्या प्रसंगांचा या रामायणात उल्लेख आहे. ते स्वयं पाहण्याचा, अनुभवण्याचा दुर्मिळ योग जुळून आला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-दापोली-प्रभागस्तरीय-क्र/
प्रिती सावंत -शिंदे यांचे मुंबई, ठाणे, पालघर इथे या नृत्यांचे प्रयोग झाले आहेत. त्यांना उत्तम प्रतिसाद लाभला. ती संकल्पना घेऊन ,त्या आता आपल्या जन्मभूमीत आपल्या २२ जणांच्या नृत्य चमुसह येत्या २६ डिसेंबर कालावधीत सादरीकरणासाठी येत आहेत. गुरु दिपाली विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले नृत्य शिक्षण पूर्ण केले.एक वेगळा प्रयोग आपल्या सिंधुकन्येने रंगमंचावर केला आहे.
कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, ओरोस याठिकाणी प्रयोग होणार आहेत. आधुनिक वाल्मिकी म्हणजेच मा. ग.दी. माडगूळकर आणि मा. सुधीर फडके यांच्या मूळ गीतरामायणावर कत्थकनृत्याचा आहे . गीतरामायण पुन्हा ऐकण्याचा आस्वाद आणि त्यावरील नृत्याचा आनंद यावेळी रसिकांना घेता येणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.