Maharashtra: बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण; कर्तव्यात कसूर करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं निलंबन

0
12
बदलापूर अत्याचार प्रकरण,
बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण; कर्तव्यात कसूर करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं निलंबन

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचारl ठाणे l 19 डिसेंबर

संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे, अशी माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्तव्यात कसूर करणाऱ्या एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचं निलंबनही करण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून एसआयटी बरखास्त झाली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुंबई-बोट-अपघातात-एकाच-क/

ऑगस्टमध्ये बदलापूर येथील शाळेच्या स्वच्छतागृहात साडेतीन आणि चार वर्षांच्या दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. ही घटना उघडकीस येताच राज्यभरात गदारोळ माजला. आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. तर संबंधित आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र त्यानंतर एके दिवशी अक्षय शिंदे याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. याच प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू होती. याच सुनावणी दरम्यान ही माहिती सरकारी वकिलांकडून देण्यात आली.

महिला पोलीस निरीक्षक निलंबित
सरकारी वकील ॲड. हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयात सांगितलं, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास आणि तपास करण्यास विलंब करणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. विभागीय चौकशीनंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं असून त्यांची दोन वर्षांची वेतनवाढही थांबवण्यात आली.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here