पोस्ट कार्यालयातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष भावना घाणेकर यांची प्रत्यक्ष भेट

0
6
पोस्ट कार्यालयातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष भावना घाणेकर यांची प्रत्यक्ष भेट
पोस्ट कार्यालयातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष भावना घाणेकर यांची प्रत्यक्ष भेट

पोस्ट कार्यालयातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष भावना घाणेकर यांची प्रत्यक्ष भेट

उरण पोस्ट कार्यालयातील सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाला सूचना

उरण :
उरण शहरातील पोस्ट कार्यालयाबाबत ज्येष्ठ नागरिकांसह अनेक नागरिकांकडून सातत्याने विविध तक्रारी प्राप्त होत असल्याची गंभीर दखल घेत उरण नगराध्यक्ष भावना ताई घाणेकर यांनी स्वतः पोस्ट कार्यालयाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

उरण पोस्ट कार्यालयात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, संगणक प्रणाली (सिस्टीम) डाऊन राहणे, अपुरा कर्मचारी वर्ग, केवळ दोनच कर्मचाऱ्यांवर कार्यालयाचा कारभार चालणे तसेच काही ठिकाणी नागरिकांना अपेक्षित सहकार्य आणि योग्य वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते, तर अनेकांना कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी पोस्ट कार्यालय प्रमुखांची प्रत्यक्ष भेट घेत नागरिकांनी मांडलेल्या सर्व समस्या आणि अडचणींची सविस्तर माहिती दिली. पोस्ट कार्यालयातील सेवा अधिक कार्यक्षम, सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती त्यांनी केली.
तसेच ज्येष्ठ नागरिकांसह प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक, तत्पर आणि समाधानकारक सेवा मिळावी यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना भावना घाणेकर म्हणाल्या की, “नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. उरणकरांच्या हितासाठी माझे प्रयत्न भविष्यातही अविरत सुरू राहतील.”
या भेटीमुळे पोस्ट कार्यालयातील सेवा व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here