Kokan: रेशनचे धान्य १ ते ४ तारीखपर्यत खरेदी प्रमाणेच द्यावे

0
31
रेशनचे धान्य,धान्यदुकानदार,
रेशनचे धान्य १ ते ४ तारीखपर्यत खरेदी प्रमाणेच द्यावे

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला प्रतिनिधी-

धान्य मिळण्यात विलंब, वीजेचा लपंडाव, सर्वर नसल्यामुळे ई पॉस मशिन नेट न मिळणे, वयस्कर व्यक्तींचे थम न लागणे आदींमुळे धान्यदुकानदारांना धान्य वितरणांत वेळ लागतो. मात्र तहसिलदार पुरवठा विभागाच्या व्हॉटस ग्रुपवर धान्य दुकानदारांच्या कामाबाबत मॅसेज पाठवून प्रामाणिकपणे काम करणा-या धान्य दुकानदारांना दोष दिला जातो. त्यामुळे धान्यदुकानदारांच्या मागणी प्रमाणे धान्य मिळावे अशी मागणी वेंगुर्ला तालुका धान्य दुकानदार संघटनेतर्फे तालुका पुरवठा विभागाकडे करण्यात आली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-राष्ट्रीय-सेवा-विभागाचे/

वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक श्री. पवार यांना सादर केलेल्या लेखी निवेदनात, आम्ही वेंगुर्ला तालुक्यातील धान्य विक्रेते (धान्य दुकानदार) दर महिन्याच्या ४ तारीखपर्यंत वेळीच धान्य खरेदी करतो असे असताना आपल्या शासकीय गोदामातून महिन्याच्या २५ तारीख होऊन गेली तरी धान्य येत नाही. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना धान्य देताना आम्हां धान्य दुकानदारांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यात ई पॉस मशीनला वारंवार सर्वर नसल्यामुळे नेट मिळत नाही. वीज गेली तरी त्यामुळे कामात व्यत्यय येतो. त्यामुळे आमच्या मागण्या लक्षात घेऊन त्याची पुर्तता करा. यासंदर्भातील लेखी निवेदन तालुका पुरवठा विभागाचे निरीक्षक विजय पवार यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांच्या हस्ते लेखी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी रविद्र पेडणेकर, गुरुनाथ मार्गी, अर्जुन सामंत, सुरेश गडेकर, सत्यवान कोळंबकर, बाबू घोगळे, जयवंत राऊत, श्यामसुंदर मुणनकर, राजन गावडे, किसन हंजनकर, सुहास नाईक, प्रिती परब, शेखर गावडे, पुजा केळुसकर, अनंत गावडे, शमिका परब, बाळाजी नाईक, सिध्देश सोन्सुरकर, राजन मोचेमाडकर आदी पदाधिकारी यांचेसह धान्यदुकानदार यांचा समावेश होता.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here