Maharashtra: मुंबईमधील होमगार्डच्या २७७१ रिक्त जागा भरणार

0
27
१० जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबईमधील होमगार्डच्या २७७१ रिक्त जागा भरणार

१० जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई l 28 डिसेंबर

बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरूष व महिला होमगार्डच्या २७७१ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी १० जानेवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येत आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा करू इच्छिणाऱ्या बृहन्मुंबईतील उमेदवारांनी नोंदणीकरीता अर्ज करावा, असे आवाहन समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांनी केले.

काही वर्षापूर्वी मुंबईतील होमगार्डच्या रिक्त जागा भरण्याच्या अनुषंगाने यापूर्वीही भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी १५०० च्या आसपास होमगार्डची भरती करण्यात आली होती. एकाबाजूला निवडणूकीच्या कालावधीत पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा पोलिस भरती प्रक्रिया अद्याप सुरु झाली नाही. त्यामुळे राज्यात अनेक तरूण बेरोजगारीच्या समस्याला सातत्याने सामोरे जात आहेत. मात्र राज्य सरकारने पोलिस दलातील अपुरी संख्येवर जास्तीचा तणाव यायला लागल्यानंतर बंदोबस्ताचा भार होमगार्डवर सोपविला जात आहे.https://sindhudurgsamachar.in/kokanवालावल-येथील-अल्पवयीन-मु/

यापार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा २७७१ होमगार्डची भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी पर्यंतची ठेवण्यात आली आहे. होमगार्डमध्ये ५ वर्षाची सेवा बजावणाऱ्यांना पोलिस भरतीमध्ये काही प्रमाणात आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मागील पोलिस भरतीत होमगार्ड असलेल्या अनेकांना पोलिस भरतीत संधी मिळाली. त्याचबरोबर पोलिस भरतीत ठेवण्यात आलेल्या आरक्षणाचा फायदाही मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here