सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे २१० हून अधिक घरफोडीचा पर्दाफाश; दोन सराईत आरोपी जेरबंद
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे २१० हून अधिक घरफोडीचा पर्दाफाश; दोन सराईत आरोपी जेरबंद
वर्तक नगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ११.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाणे : वर्तक नगर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. २१० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली. आरोपींकडून चोरीतील सोने-चांदीचे दागिने, दोन दुचाकी आणि एक कार असा एकूण ११ लाख ६५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचत गुन्ह्याचा उलगडा केला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी ठाणे शहर पोलीस कटिबद्ध असून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.