कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना भरपाईची रक्कम निश्चित करा- सुप्रीम कोर्ट

0
103

कोरोनात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी भरपाईची रक्कम निश्चित करा असे आदेश बुधवारी सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आहेत.कोरोनामध्ये जीव गमावणाऱ्यांच्या वारसांचे काय याबाबत एक दिशा-निर्देश जारी करावेत असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने तीन ठळक मुद्दे सरकारला दिले आहेत.पहिल्या मुद्यामध्ये कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर देण्यात येणाऱ्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रक्रिया सोपी व्हावी आणि यासाठी योग्य ती गाइडलाइन प्रसिद्ध करावी. दुसऱ्या मुद्यामध्ये वित्त आयोगाला अशा स्वरुपाच्या शिफारसी पाठवण्यात आल्या आहेत, त्या आधारे केंद्राने लवकरात लवकर अशा व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी, वारसांसाठी एक विमा योजना सुरू करावी. दुसऱ्या मुद्यामध्ये NDMA ने मदतीचे किमान निकष लक्षात घेऊन कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसाठी 6 आठवड्यांच्या आत गाइडलाइन जारी कराव्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here