रेशनिंग धान्य वितरणातील अडचणींबाबत पालकमंत्री नितेश राणे यांची आढावा बैठक

0
9
रेशनिंग धान्य वितरणातील अडचणींबाबत पालकमंत्री नितेश राणे यांची आढावा बैठक
रेशनिंग धान्य वितरणातील अडचणींबाबत पालकमंत्री नितेश राणे यांची आढावा बैठक

रेशनिंग धान्य वितरणातील अडचणींबाबत पालकमंत्री नितेश राणे यांची आढावा बैठक

सिंधुदुर्ग, दि. १ :
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वितरित करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रेशनिंग धान्य दुकानदार व रॉकेलधारक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली.
बैठकीत कोकणातील दुर्गम आणि डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे धान्य वितरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लाभार्थी तसेच रेशनिंग दुकानदारांची गैरसोय टाळण्यासाठी पुरवठा विभागाने शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढावा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बोलताना राणे यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले. लाभार्थी, रेशन दुकानदार आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखून नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रेशनिंग धान्य दुकानदार व रॉकेलधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूपेश पेडणेकर आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here