महसूल सप्ताहाचा शुभारंभ; उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
सिंधुदुर्ग, दि. १ :
महसूल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम महसूल प्रशासन उभारण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. नागरिकांना अधिक चांगल्या आणि गतिमान सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी सातत्याने परिश्रम घेत असून, त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.



